कातळावर बसून अनुभवलेला कायल…

पूर्वेस सूर्य उगवतो आणि पश्चिमेस मावळतो. केरळातील कायल (backwaters) हे पश्चिमेस असल्यामुळे इथे लोक मावळणारा सूर्य बघायला येतात उगवणारा नाही. अगदी तुम्ही पश्चिमेकडे उभं राहून पूर्वेला उगवणार्या सूर्याचे प्रतिबिंब त्या पाण्यात टिपण्याचा प्रयत्न केला, तरी ते तितकेसे सुंदर दिसत नाही. म्हणून अनेकजण कायलवर सूर्यास्त टिपण्यासाठी जातात. पण ज्यांना पश्चिमेस दिसणारी सकाळ किंवा मुख्यत्वे पहाट अनुभवायची आहे त्यांनी  कायलला सूर्योदयापूर्वीच तशी वेळ बघून, गजर लावून जावे.

कायलला जसजसा सूर्य पूर्वेकडे उगवतो, तसतसा आकाश आणि पर्यायाने पाण्याचा रंग देखील बदलतो. राखाडी करडा, मग गर्द निळा, मग मधेच नितळ पांढरा आणि मग हळूहळू निळ्या शाईसारखा रंग होतो. हे रंगांचे खेळ सुरू असतानाच एकीकडे जवळ जवळ शेकडो पक्षी ह्या पाण्यावरुन उडत असतात.

निसर्गाचा हा क्षणाक्षणाला बदलणारा प्रचंड मोठा canvas डोळे भरून बघण्यासाठी कायलवर एखादा दगड पकडायचा आणि त्यावर बसून राहायचे. मी बसले होते तिथून मोठ्या संख्येने कावळे, घारी, बगळे, दह्याळ आणि अजून काही बारीक पक्षी उडून जात होते. पाण्यात लांबवर १-२ होड्या वल्हवत जाणारे स्थानिक कोळी देखील दिसत होते. बगळे आणि कावळे तर अगदी काही फूटांवरुन उडत होते. Tv वर, museums मध्ये किंवा शहरात कचर्याच्या ढीगावर दिसणार्या कावळ्यांपेक्षा इथे दगडांवर स्वच्छंद बागडणार्या कावळ्यांचे सौंदर्य प्रकर्षाने जाणवते.

माझ्या तीन फूटांवरुन उडत जाणाऱ्या एका कावळ्याच्या पंखातले एक पीस गळून पाण्यावर अलगद पडले. ते कापसासारखे हलके राखडी-काळपट पीस शाई सारख्या निळ्याशार पाण्यावर पडल्याने तीन तरंग उमटले.दोन सेकंदात घडलेल्या ह्या घटनेने माझ्या दिवसाची सुरूवात झाली. ते पीस लांब तरंगत जाताना पाहणे हा एक सर्वोत्तम आनंद होता.

त्यामुळे जेव्हा तुम्ही केरळच्या कायलला भेट द्याल तेव्हा निसर्गाने आयोजित केलेला रोज पहाटेचा हा अद्भुत कार्यक्रम बघायला विसरू नका!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s