Must haves on Indian beaches 

My home town is Vasai, a small suburb in northern Mumbai, which hosts 5 beaches. Other than Vasai, I have seen many beaches on India’s shoreline over the years. Whenever someone says beach, some specific things come infront of my eyes like bhel, ice creams, playing in sand, boats, sunset and fish. But what are the other things which every Indian relate to when someone says ‘Beach’?

The golawala!
No need to go to Rajasthan for a camel ride!
Ghodagadi to give you a royal feel!
Little people digging through the sand…
Misspelled names…
Fort, coconut shell and a mirror by nature…
Some alone time…

And of course alot of fun and peace…

(Pictures taken at Alibag beach)

Advertisements

जर आणि तर

वर्तमानात जेव्हा आपल्यासोबत काही चांगलं किंवा वाईट घडतं तेव्हा आपण नेहमी विचार करतो ‘तेव्हा हे झाले असते तर आज हे झालं असतं…’ ‘जर तेव्हा तस केलं असतं आज हि वेळ आली नसती’… पण भूतकाळात जाऊन गोष्टी बदलणं तितकं सोप्पं नाही. Harry Potterचं time turner हि नाहीये आपल्याकडे नाहीतर सहज भूतकाळात जाऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी बदलता आल्या असत्या.

Mumbai Film Festival (MAMI) निमित्त ‘जर आणि तर’ ह्या मुद्द्यांवर प्रकर्षाने बोलणारे दोन सिनेमे बघण्यात आले. Hounds Of Love (देश: ऑस्ट्रेलिया; दिग्दर्शक: बेन यंग; २०१६) आणि The Unknown Girl (देश: बेल्जियम-फ्रान्स; दिग्दर्शक: Jean-Pierre DardenneLuc Dardenne; २०१६). दोन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका ह्या स्त्रीच्या आहेत. दोघी पूर्ण चित्रपटात हाच विचार करत असतात कि जर मी तेव्हा तसं केलं असतं तर आत्ता जे घडत आहे ते घडलं नसतं.

Hounds Of Love हि एका teenager मुलीची गोष्ट आहे. आई वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर ती त्यांच्यावर, खासकरून आईवर चिडली आहे. आता आईसोबत राहत असताना ती आईला सतत हुडकावून लावत असते आणि तिने सांगितलेली कुठलीही गोष्ट ऐकत नाही. एका रात्री आईने परवानगी दिलेली नसताना देखील ती एका पार्टीला जाण्यासाठी घरातून हळूच पळून जाते. त्या रात्री एक जोडपं तिचं अपहरण करतं. ते तिला त्यांच्या घरात बांधून ठेवतात, मारतात, छळतात, तिच्यावर बलात्कार होतो. तेव्हा ती सतत हाच विचार करते कि आईचं ऐकलं असतं तर हि वेळ आली नसती. हीच गोष्ट तिचं अपहरण केलेली बाईपण तिला दोन वेळा ऐकवते. आता तिला तिची चूक समजली आहे पण वेळ निघून गेलेली आहे. ज्या आईपासून लांब जाण्याचा ती प्रयत्न करत होती, जिच्याशी ती सतत भांडत होती, जिची सोबत तिला जाचक वाटत होती, आता तिच्याच भेटीची ओढ तिला लागली आहे. ती तिच्या आईला परत भेटेल का ह्या प्रश्नापेक्षा माझं मन चित्रपटातील ‘जर-तर’च्या प्रश्नावर जास्त विचार करत होतं.

दुसरा चित्रपट म्हणजे The Unknown Girl. ह्या फ्रेंच चित्रपटाच्या सुरुवातीला आपलं एक छोटं क्लिनिक चालवणारी डॉक्टर आपल्याकडील शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरला भावना बाजूला ठेवून practically काम करण्याचा सल्ला देते. तेव्हा तिच्या क्लिनिकचं दार वाजतं पण क्लिनिक बंद होऊन एक तास झाला आता दार उघडायची गरज नाही असा ‘practical’ सल्ला तिच्या विद्यार्थ्याला देत ती दारावर आलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करते. दुसर्या दिवशी दार वाजवणारी व्यक्ती एक तरुण मुलगी होती आणि तिचा खून झाला असल्याचे तिला समजते. डॉक्टरच्या मनात प्रचंड गिल्ट येतो. तिने जर दार उघडलं असतं तर कदाचित ती मुलगी जिवंत राहिली असती. ती मुलगी मेली तेव्हा तिच्या शरीरावरून तिची ओळख पटेल असं काहीच मिळालं नाही म्हणून पोलीस तिला ‘the unknown girl’ असं संबोधू लागतात. जर तिच्या कुटुंबियांचा पत्ता मिळाला नाही तर तिला ‘the unknown girl’ म्हणूनच पुरण्यात येईल हा विचार त्या डॉक्टरच्या मनात घोळू लागतो. आपल्या गिल्टमुळे ती त्या मुलीचं नाव आणि कुटुंबियांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. त्या मुलीचे अंत्यसंस्कार नीट व्हावे ह्यासाठी तिची धडपड. ती त्या मुलीच्या खुन्याला शोधात नाहीये. ती त्या लोकांना शोधात आहे जे त्या रात्री तिच्यासोबत होते. त्या लोकांकडून ती तिचं नाव, पत्ता आणि कुटुंबियांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा हा शोध सुरु असताना क्षणोक्षणी तिला ‘जर मी दार उघडलं असतं तर…’ हा विचार सतावत राहतो. डॉक्टरला शेवटी खुनी समजतो आणि त्या मुलीचं खरं नाव देखील. पण तिला त्या मुलीचा खुनी कोण हे समजल्यापेक्षा त्या मुलीचं खरं नाव समजल्यावर जास्त समाधान मिळते.

दोन्ही चित्रपटांचे शेवट हे अनपेक्षित नाहीत. चित्रपट बघताना आपल्याला माहित असतं कि शेवट काय होणार आहे पण तो कसा होणार आहे ह्याचा पत्ता दिग्दर्शक आणि लेखक लागू देत नाहीत. दोघी नायिका संपूर्ण चित्रपटात आपल्या ‘जर-तर’ च्या मुद्द्यावर विचार करत संघर्ष करत राहतात. त्यांना शेवटी हवं ते मिळतं पण ते मिळवण्यासाठी दोघींना बरंच काही गमवावं देखील लागतं, मानसिक आणि शारिरीक त्रासातून जावं लागतं. आपण आपल्या आयुष्यात ज्याप्रमाणे ‘जर-तर’च्या गोष्टी करतो आणि स्वत:चंच डोकं पोखरून घेतो तसंच त्या दोघीही करतात. प्रत्यक्ष आपल्याला आयुष्यात आपल्या निर्णयांचे चांगले-वाईट प्रसंगी टोकाचे वाईट परिणाम भोगावे लागतात तसे चित्रपटात दोघींनी भोगले आहेत. दोन्ही चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक, भाषा पूर्ण वेगवेगळे असले तरी माझ्यामते ते एक common संदेश देतात: कुठलाही निर्णय मग तो छोटा असो वा मोठा, पूर्ण विचार करून घ्या;. कुणी सल्ला देत असेल तर शांत डोक्याने ऐकून घ्या; कुणी मदतीसाठी हाक मारली तर आवर्जून मदत करा. कारण भूतकाळात जाऊन गोष्टी बदलता येतील असा time turner फक्त परीकथांमध्ये असतो. खर्या आयुष्यात आपल्याला आपण घेतलेल्या निर्णयांचे ओझे खांद्यावर घेऊनच जावे लागते. There is no turning back.

A WordPress.com Website.

Up ↑

%d bloggers like this: