मृगजळ १४: सच का सामना!

आई बाबा आलेत. आता तर ह्यांना पक्का समजणार कि मला जॉब वरून काढून टाकलंय.

हे सगळं ह्या श्रावणीमुळे होतंय. स्वत:ला मुंबई दर्शन करायचं होतं तर एकटीने यावं ना…ह्या दोघांना का घेऊन आली.. हि माझी बहिण नाही दुश्मन आहे. मला त्रास द्यायलाच जन्म झालाय हिचा. हिच्या ह्या अशा विचित्र वागण्यामुळे मी स्वत:ला कधी दोन मुलं होऊ देणार नैये. हम दो हमारा / हमारी एक.

पण आता करू काय?


किसीकी भलाई के लिये बोला झूठ झूठ नहीं होता! और खास कर तब जब वो झूठ अपनी खुद कि भलाई के लिये बोला हो!

स्वार्थात परमार्थ आहे.

त्यामुळे घरच्यांना ऑफिस मधून खास त्यांच्यासाठी दोन दिवस सुट्टी घेतली आहे असं सांगण्यात मला अज्जिब्बात लाज वाटलेली नाही.

तरी त्यात श्रावणीचे दहा हज्जार प्रश्न. अशी कशी सुट्टी दिली? कुणी दिली? का दिली? तुला काम नाहीये का? बॉस ओरडले नाही का?

असो.

आता आज परत ह्यांच्यासोबत मुंबई दर्शन. चलो.


घरच्यांसोबत फिरायला जायचं म्हणजे एक वेगळाच experience असतो. तेच शहर, तेच रस्ते, तेच लोक किती वेगळे वाटतात. काल ह्याच भागात एकटी फिरत होते, आज ह्यांच्यासोबत. Total perspective change.

आणि सर्वात भारी म्हणजे हे बेस्टचं फिरतं उपाहरगृह. स्वस्त आणि मस्त. राजाबाई tower आतून बघता येत नाही ह्याची खुन्नस त्याच्या समोरच उभ्या असलेल्या ह्या बसमध्ये स्वस्तात पेटपुजा करून निघाली.

Jpeg

कधी विचारही केला नव्हता कि बेस्टच्या normal regular city busचं रुपांतर ह्या लोकांनी restaurant sorry उपहारगृहात केलं असेल! इथे छोटं बेसिन पण आहे आत…हेहेहे…आणि चहा फक्त ६ रुपयात! च्यायला पुण्यात पण एवढा स्वस्त मिळत नाही.


काय हौस आहे ह्या लोकांना मुंबईच्या लोकलमधून जायची. इतकी गर्दी, कचकच, त्यात ह्या shopping bags, त्यात आई आणि श्रावणी पण माझ्यासाठी bags सारख्याच आहेत. हातात पकडून घेऊन जावं लागतंय ह्यांना.

एक लोकल गेली तर काय झालं दुसरी मोकळी येईल कि! काय मूर्खपणाचं logic लावते हो श्रावणी. जरा म्हणून गप्प बसवत नाही.

अरे यार आता ह्या इतक्या गर्दीत मुंबईत कोण मला हाका मारतंय??


१५ दिवस होते मी त्या ऑफिसमध्ये. हि पद्मश्री ऑफिस खालच्या रस्त्यावर पण कधी दिसली किंवा भेटली नाही मला. आणि आज भेटली तर direct स्टेशन वर. ते हि आई बाबा आणि ती भोचक भवानी श्रावणी सोबत असताना.

हजारो प्रार्थना केल्या तरी हि मुंबा देवी थोडी ऐकणार होती माझं. समजलंच शेवटी आई बाबांना कि मला काढून टाकलंय म्हणून. नशीब तिने कारण नाही सांगितलं.

माझ्या आळशीपणामुळे जॉब वरून काढून टाकलं. वा! काय कारण आहे!

आणि आई बाबांना पटलं पण. अशा अविर्भावात वावरत आहेत कि जणू किती ओळखून आहेत ते मला.

पण आता पुढे काय?

क्रमशः

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s