मृगजळ ७: Hangover

Thank god I didn’t have sex with him…

नशेत प्रेम करण्यात काय मजा…प्रेमात नशा असायला हवी…काय फिल्मी dialogue मारतो हा पाटील…

आता आईला काय सांगू..आधी अश्विनीशी बोलते..


हो आई…अग ऑफिसमध्येच विसरले फोन चार्जिंगला लावून…आणि घरी पोहोचायला मध्यरात्र झाली मग फोन नाही केला..

sorry आई…ह्या पुढे नाही होणार अस…promise…हो आई…नाही आई…ठीके आई…समजलं आई…आई….बास आता…


I hope ऑफिसमध्ये कुणाला काही समजलं नसेल…नाहीतर माझी वाट…इज्जतीचा कचरा…

इज्जतीचा कचरा?? मुंबईत राहून माझी भाषा सोल्लिड बिघडणार आहे…

ऑफिसला पोहोचायची वेळ लंच टाईम..वा क्या बात है…ती बया कीर्ती भडकणार आहे माझ्यावर…

प्रदीप काय विचार करत असेल…मी उशिरा आल्याचं पाहून काय react होईल…मी त्याच्या opinion चा इतका विचार करायला हवा कि नको…

Polinion वर pole टाकते… Should I consider the opinions of my secret crush or not?

पाटील काय विचार करत असेल माझ्याबद्दल?

Polinion वर सगळ्यांना वाटतंय कि मी त्याच्या opinion चा इतका विचार करायला नको…ह्म्म्म….

मी इतका विचार का करत आहे…अजून कालची उतरली नाहीये…बाप्पा…ह्या अशा भंजाळलेल्या अवस्थेत काम कसं करणारे मी…


दोघ एकत्र ऑफिसमध्ये आलो, दोघांचे डोळे लाल, दोघ hangover मध्ये, मी कालच्याच कपड्यांमध्ये, त्याने दाढी केलेली नाही…. Obviously सगळ्यांना समजणारच ना कि आम्ही दोघ एकत्र होतो काल रात्री….

मूर्ख मुलगी…आज सरळ सुट्टी घ्यायला हवी होती…किमान त्याच्या सोबत न येण्याची हुशारी दाखवायला हवी होती…पण नाही… Madamचं डोकं भलतीकडे फिरत होतं…भोगा आपक्या कर्माची फळं…

पहिल्याच आठवड्यात सिनियर सोबत night out…काय image राहिली माझी…सगळ्यांचं gossip सुरु झालं असेल…सगळे कसे बघत आहेत माझ्याकडे…मी बोलणार नाहीये कुणाशीच…

डोकं दुखतंय सांगून कल्टी मारते…आणि आज सरळ घरी जाणार…नो मरीन ड्राईव्ह…आणि दारू तर अजिबात नाही…


अश्विनी बरोबर म्हणाली…मी किमान तिला तरी सांगायला हवं होतं कि मी पाटील सोबत बाहेर आहे…तिने आईला काहीतरी सांगून वेळ निभावली असती…

पण आता ह्या गोंधळामुळे मला तिला तिच्या अस्वछतेवरून ओरडता येणार नाही. किमान आठवडाभर तरी नाहीच नाही…

चार दिवसांत चार हजार गोष्टी घडल्या माझ्यासोबत…बरोबरच म्हणतात…मुंबईत काहीही होऊ शकतं…कुणाचा काही भरवसा नाही…


मयुरी आता शिव्या घालणार आहे…तिचा मदर टेरेसा मोड on होईल…एकवेळ आईला गुंडाळण सोप्पं पण हिला नाही…आज रात्र जाणार लेक्चर ऐकण्यात…

facetime-1


९….मयुरी….परत उशीर….माझ्याच सोबत असं का होतंय….

क्रमशः

 

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s