मृगजळ ६: Night Out

अश्विनी घरातली काहीच कामं करत नाही…मीच सगळ आवरते नाहीतर तिचे…काय म्हणावं…visiting boys…

हा…मी आज रात्री बोलणार आहे तिच्याशी…स्पष्टपणे… आता अश्विनी सोबत साम वापरण्याची वेळ आली आहे…


ह्या लोकल ट्रेन्स मध्ये बायकांचे ग्रुप होतातच कसे…मला तर एक हि चांगली मुलगी/बाई/आजी दिसलेली नाही जिच्याशी मैत्री होऊ शकेल…आणि किती बडबड करतात ह्या…माझ्या JBL च्या full volume हेडफोन्स  मधून पण ह्यांचा आवाज ऐकू येतो…

आणि ह्या फूड stalls वर गाजराचा ज्यूस कोण पीत असेल…सगळ्या स्टेशन्स वर दिसतो हा..

कुत्री, भिकारी आणि कचरा…त्यांचे ते विचित्र वास…दुसरीकडे चकाकते सरकते जिने…लक्ष्मी रोडवर दुहेरी वाहतुक सुरु झाली तर कसं वाटेल तसा विचित्र contrast आहे…पण पुरुष मात्र same…हात लावायचा किंवा धक्का मारायचा chance सोडत नाहीत…


खूप बोअर होतंय आज ऑफिस मध्ये…काहीच बरोबर वाटत नाहीये…मरगळ आल्यासारखं…अभिमन्यू नसल्यामुळे? I don’t have a closure in my life anymore… लक्षच लागत नाहीये कशात…

प्रदीप पण बोअर वाटायला लागलाय…

ह्या कीर्ती आणि पाटीलचा प्रोब्लेम काय आहे…दोघ एकाच पानावर आहेत तरी भांडत आहेत…नक्की कशावरून भांडत आहेत…

आज लवकर निघू का…रूम वर जाऊन करणार काय पण…मरीन ड्राईव्ह ला जाऊ? पण तिथे जायचं कसं?


पाटील सोबत मरीन ड्राईव्हला येण सुबुद्धी आहे कि दुर्बुद्धी? त्याला आधीच सांगून ठेवते कि मी अजिबात इंटरेस्टेड नाहीये…उगाच गैरसमज नको व्हायला..

Leopold कॅफे…इथेच आले होते ते दोघ…अंगावर आलेला शहारा दोन बीअर प्यायल्या तरी अजून तसाच आहे…

beer


मुंबई रात्री अजून सुंदर दिसते…भरपूर प्यायल्या नंतर बाईक वरून long ड्राईव्हला जा..पुणे काय मुंबई काय…सगळ sameच वाटत…

पाटील इतका काही वाईट नाहीये…सोल्लिड स्ट्रगल केला ह्याने…त्या स्ट्रगलर साला वाल्यांनी एक एपिसोड ह्याच्यावर पण करायला हवा…

बिचारा…ह्याला कुणी चांगली मुलगी का नाही मिळत…


आई ग…भूक लागली आहे मला…डोकं पण दुखतंय…अश्विनी…मला पाणी देतेस का जरा प्लीस…

आई ग…किती वाजलेत…आईचे १५ missed calls…अश्विनीचे दहा…का इतके फोन करतात लोक…जिवंत आहे मी मेलेले नाही…


११.३०?????

आणि हे कुणाचं घर आहे??

क्रमशः

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s