मृगजळ ५: एक घाव दोन तुकडे!

अश्विनीचे मित्र, boyfriend, one night stand सगळे आलेले चालतात पण माझा एकमेव ex-boyfriend आला तर प्रॉब्लेम होतो…आता मला काय स्वप्न पडलं होत का कि मी reply नाही केला तर हा मध्य रात्री उठून इथे निघून येईल…ह्या अशा चिपकू स्वभावामुळेच तर सोडलं होत मी त्याला…

पाटील, कीर्ती कि प्रदीप? कुणाला मेसेज करू की उशीर होतोय…पाटीललाच करते…तसंही काल रात्री तो लाईन मारत होता..

विचित्र माणूस आहे हा पाटील…रात्री फ्लर्ट करतो आणि सकाळी भडकतो…आता ह्या अभिमन्यूची व्यवस्था लावून जावं लागेल…


पहिल्याच आठवड्यात तोंड घशी पडत चाललेय मी… नवी कोरी बाळंतीण आपल्या बाळाला ऑफिसला घेऊन जाते तसं मी ह्या अभिमन्यूला घेऊन जात आहे…प्रदीप काय म्हणेल आता…

आणि ह्या मूर्ख माणसाला लोकलने प्रवास करता येत नाही..म्हणे रिक्षा घेऊन जाऊ…मालाडहून परळला पेशव्यांनी नेली होती ना रिक्षा..

122


झालं…ऑफिसमध्ये पण ह्याचे तमाशे…Thank god पद्मश्रीने सांभाळून घेतलं…

पण आता माझा आणि प्रदीपचा chance संपला…अभिमन्यू बद्दल समजताच कसं वाकडं तोंड केलं त्याने…

बास झालं आता… मी ह्या अभिमन्यूला जायला सांगणार आहे…

अरे मूर्ख माणसा!! ह्याला पुण्याला जायला सांगितलं तर परळ दर्शन करून येतो म्हणे…

काय करू???


पाटील दिसतो आणि वागतो विचित्र पण बोलतो perfect… शांतपणे ह्या अभिमन्यू प्रॉब्लेमचं solution सांगितलं त्याने…


भर स्टेशन वर कानाखाली मारली मी त्याच्या…बाप्प्पा…चितळेंच्या दुकानात एक वाजून दोन मिनिटांनी पोहोचल्यावर जसा एखाद्याचा चेहरा पडतो अगदी तसाच चेहरा पडला होता त्याचा…

साम दाम दंड भेद….एका दिवसात साम दाम आणि भेद करून झाले…शेवटी दंड करावाच लागला…I hope it will stop him now…जियो पाटील…


गेला बाबा एकदाचा अभिमन्यू…ह्या शहरातून आणि माझ्या आयुष्यातून…काय करावं लागेल हे माहित होतं तरी कधीच करू शकले नाही त्याच्या बाबतीत…ही हिम्मत पाटील मुळे आली आहे…आणि मुंबई मुळे…पुण्यात असं काही करायला मनच धजावलं नसतं माझं…

पाटीलला thank you मेसेज करते…

अभिमन्यू गेलाय तरी मन अजून जड का आहे…मी केलं ते बरोबर होत पण तरी बरोबर का वाटत नाहीये… Emotional void तयार झालाय…


हा आई…नाही काही नाही झालेलं…खूप थकलेय ग…म्हणून…

तुला कसं समजलं कि अभिमन्यू मुंबईत आला होता?

ह्या श्रावणीला काही कामधंदे नाहीयेत…दिवसभर Facebook वर टाईमपास करायचा आणि मग येऊन तुझे कान भरायचे…

नाही आई आताच तर आलेय न…लगेच काय घरी ये…आणि तसं हि ह्या weekend ला मला काम आहे…शनिवारची सुट्टी नसते इथे आणि रविवारी रूम आवरायची आहे आणि इथलं थोडं सामान घ्यायचं आहे…

आहेत ग पैसे..रोज रोज तेच प्रश्न काय विचारतेस…

मी कुठे चिडचिड करतेय…काहीही…बर राहू देत…मी ठेवते फोन झोप येत आहे मला…बाय…


मेली झोपच येत नाहीये…रोज रात्री त्या अभिमन्यूशी बोलत असायचे त्याची इतकी सवय झालीये…पण एका दृष्टीने बरंय कि तो आता मेसेज करत नाहीये…

पण मग आता कुणाशी बोलू…


८.३६….पाटील……

क्रमशः

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s