मृगजळ ४: Surprise!

दुसर्याच दिवशी ओरडा खाल्ला…हे सगळं त्या अभिमन्यू मुळे झालंय..मी ह्यापुढे त्याच्याशी एक शब्द हि बोलणार नाहीये…

इतकी छान तयार होऊन आलेय मी..आणि हा प्रदीप मला compliments देण्याऐवजी console करतोय…

कीर्ती काय कमी होती जे मला आता ह्या पाटीलला पण रोज reporting करावं लागेल….जरा विचित्रच आहे हा..एका क्षणी ओरडतो आणि दुसर्या क्षणी काहीही झालेलं नाही अशा अविर्भावात वागतो..सुजाताची मस्तानी खायला गेलेला माणूस एकदम निंबाळकरची मस्तानी खाऊन आला तर कसं वाटेल…अगदी तसच आहे हे पाटील प्रकरण…दिसायला ठीक आहे पण पोट जरा पुढे आलंय…मुंबई सारख्या धावणाऱ्या शहरात राहून पण हि अवस्था…

ह्या लोकल ट्रेन्स मध्ये खूप गोष्टी स्वस्त मिळतात असं ऐकल होत पण दोन दिवस झाले इथे मला धक्क्यांशिवाय दुसरं काही मिळालेलं नाही…


आज भलताच उशीर झालाय…दहा वाजलेत..रिक्षा मिळेल कि नाही..आणि मिळाली तरी रिक्षावाला पाचपट पैसे घेणार…

Rickshaw Queue

अर्धा तास झाला ह्या रिक्षाच्या रांगेत थांबून…कधी येणार माझा नंबर…संध्याकाळी ६ला दांडेकर पुलाच्या चौकात टमटमसाठी असते तेवढी गर्दी आहे इथे…आता घरी जाणार कधी… स्वयंपाक करणार कधी…खाणार कधी…


हो maggi खात आहे…पण आई ला सांगू नकोस..चिडेल ती…

अग आई खूप उशीर झाला यायला आणि मग काही बनवण्याचा कंटाळा आला म्हणून..हो पुढच्या वेळेस मेतकुट भात खाईन…हो ग आई…

काय?? मेली ती? आणि त्याने लगेच लग्न पण केलं? कस काय?? नाही..नको सांगूस…मी ऑनलाईन बघेन एपिसोड…

बाबांना सांग पैसे आहेत म्हणून…दोन दिवसात सगळी गंगाजळी नाही उधळलेली मी…हो हिशोब लिहित आहे सगळे…


हा पाटील मला का मेसेज करत आहे…ह्म्म्म…प्रोफेशनल प्रोफेशनल म्हणून नंतर फ्लर्ट करेल…ह्याचा काही भरवसा नाही…

ज्याचा मेसेज यायला हवा तो काही मेसेज करत नाही…मीच करू का त्याला मेसेज नाहीतर? पण काय मेसेज करू..काहीतरी मदत मागते…Damsel in distress types काहीतरी…

हा…हे smart card काय असतं आणि कसं वापरायचं ते विचारते…

सगळे पुणेकर maggi point ला मजा करत आहेत…मीच बिचारी इथे…फोटो पाठवून जळवतात मेले…कुणाला पचणार नाही ती maggi…

हा प्रदीप किती मूर्ख आहे…म्हणे Google कर…मुलगी समोर लाईन देत आहे तरी समाजात नाही…शी बाबा…

आज ह्या अभिमन्युशी मी अजिबात बोलणार नाहीये…


काल रात्री त्या मूर्ख अभिमन्युशी बोलले नाही ते बर झालं…किती आरामात उठले मी…आता सावकाश आवरून निघेन…

अश्विनी…दार बघ ग…कोण आलंय ते…मी अंघोळीला जात आहे…

मला body wash च्या ऐवजी पोह्यांच्या वास का येतोय… अश्विनीला तर साधा चहा पण करता येत नाही… हा आवाज ओळखीचा का वाटतोय? कोण आलंय नक्की?


तू??? What the fuck are you doing here?

क्रमशः

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s