मृगजळ ३: दे धक्का!!!

नशीब ११ ची मीटिंग होती. नाहीतर मी वेळेत पोहोचण शक्यच नव्हतं.

तरी ती कीर्ती बोललीच. १५ मिनिटांचा उशीर हा उशीर थोडीच असतो. अश्विनी होती सोबत म्हणून १५ मिनिटांवर निभावलं. नाहीतर ह्या जंगलात मी अजून २ तास तरी भटकत असते.

केवढूसं ऑफिस आहे हे. एवढी मोठी वेबसाईट आणि एवढं छोटं ऑफिस. असो. मला कुठे आयुष्यभर इथेच काम करायचं आहे.


प्रदीप……….

किती गोड दिसतो तो. केरळी नसता तर पेशवा म्हणून शोभला असता अगदी. FC रोड वर पण इतकी cute मुलं दिसत नाहीत.

ह्याचा फोटो पाठवते मयुरीला…जळफळाट होणार आता तिचा…हा हा हा हा…


आई अग टपरीवर जातात हे लोक जेवायला. इथे ऑफिस मध्ये जेवण येत नाही. मंथली मेस पण नाहीये इथे.

अग हो.

मी मंथली मेस बद्दल विचारलं तर ती पद्मश्री म्हणाली ये क्या होता है?

हा आता रोज डब्बा घेऊन येईन. रोज रोज बाहेर जेवण चांगलं नाही.


सिगरेट पिण्यासाठी टेरेस? इथे किती छान फुलझाडे लावून बाग करता येईल. मोगरा, चंपा, गुलाब, जाई, प्राजक्त.

हा प्रदीप पण सिगारेट पितो? शी बाबा..दिवसाला एक घेत असला तरी काय झालं..मला अशी व्यसनाला आहारी गेलेली मूलंच का भेटतात..


ह्या ऑफिस मधल्या चांडाळ चौकड्या त्या pretty little liars च्या चौघीजणीसारख्या वाटत आहेत. ह्यांच्या पासून चार हात लांब राहिलेलं बर.

ही पद्मश्री त्यातल्या त्यात चांगली आहे. हिच्याशीच मैत्री करते. त्या निमित्ताने २-३ south Indian dishes शिकून घेईन. प्रदीपला इम्प्रेस करायला मदत होईल…


ही पास ची रांग आहे कि काय. आयुष्यात पहिल्यांदा इतकी मोठी रांग बघत आहे. ह्या लोकल पेक्षा ती PMT बरी. भांडून आळशीपणे का होईना १५ मिनिटांत पास देतात. वर्षाचाच काढून घेते. नंतर कटकट नको.

४ ट्रेन्स सोडल्या तरी गर्दी काही कमी होत नाहीये. कोथरूडच्या ४ बसेस सोडल्यावर ५व्या बसमध्ये हमखास खिडकीची जागा मिळते. इथे दारावर उभं राहण्या इतकीही जागा नाही. एवढे लोक येतात कुठून? हा…आता ह्या ८.४ च्या ट्रेनमध्ये घुसतेच मी..त्याशिवाय पर्याय नाही…आई ग माझा पाय. आणि माझी चप्पल. माझे केस.

WhatsApp Image 2016-09-04 at 11.44.18 AM

एवढ्या रात्री पण स्टेशनवर चांभार आहेत हे जगातलं आठव आश्चर्यच म्हणायचं. उगाच ह्या चपला घातल्या. उद्या पासून सरळ फ्लोटस घालणार आहे मी. आता ही विचित्र शिवलेली चप्पल घालून कसरत करत जावं लागणार घरापर्यंत.


इथे पण मंथली मेस नाही. ही अश्विनी पण रोज बाहेर जेवते? दोन्ही प्रहर बाहेरचं जेवण?

आई खूप आठवण येतीये तुझी. श्रावणीला सांग मला चिडवण बंद कर नाहीतर फोन मधून हात घालून दात तोडेन तिचे.


फेसबूक वर स्टेटस अपडेट करून अर्धा तास झाला आणि फक्त १५ likes? पूणे सोडल्याचा परिणाम.

प्रदीपला रिक्वेस्ट पाठवू कि नको?

Instagram वर आज काढलेल्या photos चं कोलाज टाकते.

प्रदीपला Instagram वर follow करते. One by one. अति घाई संकटात नेई.

नशीब ह्या घरात wi-fi आहे.

मयुरी आता येते म्हणाली आणि परत गायब. मी किती वेळ फेस टाइम on ठेवू आता.

प्रदीपने मला follow back केल. एखाद्याने किती desperate असावं. लगेच मागेमागे आला..जणू माझ्या रिक्वेस्टची वाटच बघत होता…

काय दिवस आलेत माझ्यावर. आज पण फोडणीच वरण आणि भात. इतक साजूक जेवण रोज जेवले तर काय व्हावं माझं?

हि मुलगी कोण आहे? त्याची girlfriend तर नाही? नाही बहिण आहे. कसले भारी फोटोस आहेत ह्याचे. उद्या ऑफिसला तो स्कर्ट घालून जाते. प्रदीप वर थोडं तरी इम्प्रेशन पडायला हवं.

ह्या अभिमन्यूने आज मेसेज नाही केला. विसरला वाटत. बरय.


८.३०??? परत उशीर? अभिमन्यू…..

क्रमशः

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s