मृगजळ २: दिवस पहिला

किती कचकच आहे इथे. शी… स्टेशन आहे कि मंडई?

आता हे east आणि west काय गोंधळ आहे..सरळ गाव आणि शहर आणि बाकी रस्ते असे भाग नाही करता येत का?

हा taxi वाला लईच हुशार वाटतोय. Google maps open करते. नाहीतर भलत्याच अंगाला न्यायचा हा.

नशीब Google maps आहेत म्हणून..ह्या शहरात एक हि कामाची पाटी नाही..

अश्विनी पण न…ह्या watchman ला सांगता येत नाही कि मी पुण्याहून येणार आहे.. हजार चौकश्या ह्यांच्या….


आश्चर्य आहे दुपारचे १.३० वाजले होते तरी शेजारच्या काकू जाग्या होत्या..मला वाटलं किल्ली सोबतच आता मणभर शिव्या मिळणार आपल्याला. पुण्यात असते तर काकूंनी दारच उघडलं नसतं…

किती पसारा आहे घरात..आणि खिडकीत एक हि भांडं नाही! बिचारे पक्षी पाणी कुठून पीत असतील?

नळाला पाणी नाही? आता मी आवरणार कस? फक्त एक बादली पाणी? सप्टेंबर मध्येच दुष्काळ…बाकी वर्ष कसं निभावणार देव जाणे…

वाईट आहेत मुंबईकर..जरा मदत करत नाहीत..एक extra बादली पाणी मागितलं तर लगेच कसं तोंड वेडावून दाखवलं…ह्यांच्यापेक्षा आम्ही बरे. तुसडेपणाने का होईना उत्तर तर देतो.


आई अग इथे चितळेंचं दूध नाही मिळत. अमूल आणि कुठलं तरी गोकूळचं दूध मिळत. आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे कि नै? तरी इथल्या दुकानदारांना साधं मराठी बोलता येत नाही? नुसत्या मराठी पाट्या लावून काय होत.

नाही अश्विनी उशिरा येणार आहे.

अग ह्या एवढ्या ८ मजली इमारतीत फक्त ३ मराठी बिर्हाड राहतात. त्यातल्या एका घरात आम्ही. आता उरलेल्या दोन घरात खरंच मराठी लोक राहतात कि ती पण भाड्याने दिली आहेत देव जाणे.

नाही मी थोड्या वेळाने खाली जाईन आणि एखाद अमृततुल्य शोधून चहा क्रीमरोल खाईन.

हो आई. नाही आई. बर आई. ठीके आई. हो आई. सांगते आई. नक्की आई. Don’t worry आई. आई बास. आई मी लहान नाहीये. आई मी पौडाहून नाही आलेले.


मी इतकं छान फोडणीचं वरण केलं आणि अश्विनीला आवडलं पण नाही. शी बाबा.

इथे जेवणाचे आणि बाकी खाण्यापिण्याचे solid हाल होणार आहेत माझे…अमृततुल्य नाही….कात्रजच्या घाटातल्या निळ्या plastic चं छत असलेल्या उघड्या चहाच्या टपर्या….रडूच येतंय मला…

WhatsApp Image 2016-09-04 at 12.01.16 PM

हे m-indicator किती अवघड आहे.

कामाचं ठिकाण इतकं लांब नसत तर सरळ माझी स्कुटी आणली असती.

त्या लोकल मध्ये माझी वाट लागणार आहे.

हुशशश.. नशीब अश्विनीला माझी बाकरवडी नाही दिसली. ह्या कपड्यांच्या मागे लपवते. Share करत बसले तर माझी बाकरवडी दोन दिवसात संपेल.

उद्याची सगळी तयारी करून ठेवली आता शांत झोपते. उद्या लवकर उठायचंय. पहिला दिवस ऑफिसचा उगाच उशीर नको व्हायला…

किती प्रकाश येतोय ह्या खिडकीतून. एवढ्या मोठ्या आवाजात कुणी tv कसा पाहू शकत. ११ वाजले.  मध्य रात्र झाली तरी हे आवाज काही बंद होण्याच नावच घेत नाहीयेत.

गरम होतंय नुसत.

अश्विनीचा boyfriend इथे राहत नसता तर निदान तिच्या सोबत तरी गप्पा मारत बसले असते. का आवडत असेल तिला तो? जनसेवेच्या खरवसापेक्षा जास्त थुलथुलीत आहे तो.

ह्या अभिमन्यूला मी अजिबात reply करणार नाहीये. आमचं ब्रेकअप झालं आहे आणि मी इथे move on व्हायला आलेय.


८????? परत उशीर.. अभिमन्यू………

 

क्रमशः

 

Advertisements

5 comments

  1. मस्तच ! ! !! वेगळा प्रयोग ! ! एका देशावरच्या माणसाचा कोकणी भूमीत जगण्याचा प्रवास, नव्याने ! !

    Like

  2. लवकरच तुझ्या ब्लॉगवरील प्रतिक्रियांमध्ये मुंबई-पुणे-मुंबई सुरू होणार आहे. 😛

    Like

  3. बाकी पुण्यासारख्या चहा कुठेच मिळत नाही बरं…..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s