मृगजळ १: पूर्वतयारी

खाउची bag आई भरून देत आहे.

कपड्यांची bag भरली. कुडते, लेगीन्स, जीन्स वरचे कुडते, पलाझो वरचे कुडते, चुडीदार. अरे हा स्कर्ट पण घेते. पहिल्याच आठवड्यात घालेन. म्हणजे त्या मुंबईकरांना टिच्चून सांगता येईल कि पुणेकर मुली कुडत्यांच्या पलीकडेही कपडे वापरतात.

ह्या bag मध्ये सगळ्या accessories आणि चपला आहेत. अय्यो स्कार्फ राहिलेच कि…

111

आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टी वरच ठेवते…

४ वाजता चितळे उघडले कि बाकरवडी आणि आंबा बर्फी घेऊन येईन. मुंबईत काही मिळणार नाही. रोहित मध्ये पण जायचंय. Moisturizer आणि cleansing milk चे extra डब्बे आणेन. हे डब्बे आई आणि श्रावणी साठी राहू देत.

मयुरीला मेसेज करते ६ वाजता वैशालीला भेटू.

शिकरण करायचं कालच ठरलं होत तरी केळी नाही आणली. आता मी माझी शेवटच्या टप्प्यातली खरेदी करू कि केळी शोधत फिरू.

ह्या रोहितला पण आजच भेटायचं. आता ह्याला गावातच बोलावते. पार्किंग मिळणार नाही तर गाडीवर उभ करते म्हणजे सगळी खरेदी पण भरभर होईल.


माझी चेकलिस्ट कुठे गेली? श्रावणी माझ्या सामानाला हात लावायचा नाही किती वेळा सांगितलंय? आणि मला माझी छत्री हवी आहे.

पैसे सर्व bags मध्ये ठेवले.

कंगवा, टूथपेस्ट, कपडे धुवायचा साबण आणि ब्रश, छोटा टॉवेल, मोठे टॉवेल, दगडूशेठचा गणपतीचा  फोटो, extra घड्याळ, नेलपेंट, कापूस, टंग क्लिनर, मेणबत्ती, अधिकच्या प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याची बॉटल…….

तिकीट, हेडफोन्स, काजळ आणि खणाचं पाकीट वरच्या side bag मध्ये ठेवते.

सुट्टे पैसे मागच्या कप्प्यात.

चला फोन चार्जिंगला लावून ठेवावा. नाहीतर उद्या पंचाईत.

ह्या मंद अभिमन्यूला पण आत्ता गप्पा मारायच्या आहेत. मगाशी मेसेज केला तेव्हा कुठे मेला होता देव जाणे.


हि आई सकाळी सकाळी का ओरडत आहे.

सव्वा पाच? माझा अलार्म का नाही वाजला? फक्त ४२% battery? अभिमन्यू…………

मला सकाळी अमृतेश्वरचे पोहो खाऊन जायचं होत..आता अंघोळ आणि काजळ लावण्यातच पंधरा मिनिट जाणार..

पाउणे सहा…माझी सिंहगड चुकू नये म्हणजे मिळवलं..

गणपती बाप्पा मोरया…

 

क्रमशः

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s