मृगजळ १६: To Be or Not To Be

जसजसं वय वाढायला लागतं, तसतसं ‘The one and only’, ‘made for each other’, ‘the perfect couple’ अशा typesच्या concepts वरून विश्वास उडायला लागतो.

There is nothing called as perfect love or perfect partner. You like someone; you start spending your time with that person or marry that person and you work your ass off to make that relationship a success. There is nothing called as a sixth sense or मन कि बात पहचानली… We have to learn from experience and the studies our brain conduct about that person cautiously or sub cautiously.

cover


एका रात्रीत अवधूतला जितकं ओळखलं तितकं आजपर्यंत कुणालाच ओळखलं नव्हतं. It’s a different kind of feeling. My mind and my soul want to trust him.

माझी ऑफिसमधली राम कहाणी ऐकल्यानंतर त्याने त्याच्या start up firm मध्ये जॉब ऑफर केला. पगार जास्त नाहीये. पगार जास्त नाहीये पण टीम चांगली आहे. नवीन कंपनी असल्यामुळे कुणी मला हुडूत थुदूतपण नाही करणार. मला खरंच creatively काम करता येईल.

अवधूत सोबत एकाच ऑफिसमध्ये म्हणजे आमच्या one night standचं रुपांतर dating, मग relationship, मग आम्ही एकमेकांसोबत एकमेकांच्या family functions ना जाऊ … आणि मग लग्न…मग एक मुलगी…पण त्याला मुलगा हवा असेल तर? आणि हुंडा?


Fuck…. एका जॉब ऑफरच्या बेसिस वर मी काय स्वप्न रंगवतीये???? एकीकडे practical आणि दुसरीकडे emotional… Concentrate on one thing….जॉब, पैसे, security, creativity आणि… आणि… आणि relationship…

जसं समर्थ रामदासांनी ‘मनाचे श्लोक’ लिहिले होते तसं कुणीतरी ‘विशीतल्या confused generationच्या मनाचे श्लोक’ लिहायला हवेत…

कितीही म्हटलं तरी हा विचार डोक्यातून जातच नाहीये… ok… एक काम करते, त्याला जॉबसाठी तर हो म्हणते बाकी माझे खयाली पुलाव खायचे कि नाही ते नंतर बघू…


हा आई…मी हो म्हटलं त्याला आता नाही म्हणू शकत नाही…

आई कसं वाटेल ते.. आधी हो म्हटलं आणि नंतर नाही..

अग माझ्या लक्षातच नाही आलं त्याला हे विचारायचं…मला वाटलं मुंबईतच असेल म्हणून त्याची firm. अग नाही म्हणजे मी चौकशी केली आहे. तडका फडकी निर्णय घेत नाहीये.

हो अश्विनीच्या ओळखीचा आहे.

हो आई. नाही आही. बरं आई. बघते आई. आई मी नको घेऊ का हा जॉब?

आई आता एवढ्या सूचना केल्यानंतर मला जर सरळ सरळ समजतंय कि तुला नकोये मी हा जॉब घेतलेलं तरी ह्यानंतर तू असं कसं म्हणू शकतेस कि तुझा निर्णय तूच घे म्हणून….

आई यार आता ह्यात सुमित्रा मावशीला विचारण्यासारखं काय आहे? Decision आपल्याला घ्यायचा आहे ना??

WHAT?????? श्रावणी माझ्या बाजूने भांडत आहे तुझ्याशी? She wants me to take the job? काय झोल ए बाप्पू??

आई बाबा श्रावणी It’s final.. I am taking this job…

I am going to take this job…


Finally मी स्वत:च स्वत:साठी निर्णय घेतला.

आता हैद्राबादला शिफ्ट व्हायची तयारी करा. नवीन शहर, नवीन जॉब, नवीन माणसं, नवे अनुभव…

समाप्त

 

Advertisements

मृगजळ १५: Optimistic कि Pessimistic?

दोन दिवसांसाठी आलेली मंडळी माझ्यामुळे एका दिवसात परत गेली. श्रावणी पण टोमणे मारायचा chance सोडत नाही. आई बाबा पण जेवढ्यास तेवढं बोलत होते. जसं कि मी कुठली खानदान कि परंपरा मोडून आलेय आणि समाजात ह्यांचं नाक कापलं गेलंय.

कसं बसं convince केलं ह्या लोकांना कि कुणाला सांगू नका मला काढून टाकलंय म्हणून…श्रावणीला तर blackmail करावं लागलं.

आता आज पासून अश्विनीने दिलेल्या contacts ना contact करून job hunting सुरु करायचं. नाहीतर माझं काही खरं नाही.


माझ्यासोबत ह्या लोकांनी प्रदीपला पण काढून टाकलं? किती दुष्ट आहेत हे. अरे ह्यात त्याची काय चूक कि तो gay आहे. Join करताना कुठल्याही form वर लिहिलेलं नसतं कि तुम्ही gay असाल तर टिक करा…

ह्याला आपले gay म्हणून हक्क पण माहित नाहीत… I mean मान्य आहे भारतात अजून कायद्याने मान्यता नाही अशा संबंधांना पण तुम्ही नोकरीवरून नाही काढू शकत.

नशीब मी वाचते म्हणून मला माहित आहे…दोस्ती NGOचा contact दिला मदतीसाठी तर interview सोडून मला thank you पण न म्हणता पठ्ठ्या सरळ बाहेर पळाला…


Mutual misunderstanding

Non co-operative environment

Not as I expected

False job profile

शेवटचा जॉब का सोडला असं विचारतील तेव्हा ह्या options मधलं नक्की काय उत्तर देऊ हेच समजत नाहीये.

खूप कटकटीचं असतं हे interview देणं. बळेबळे हसा. आपल्या बद्दल वाढवून चढवून सांगा. चांगले कपडे घालून जा. Resumeच्या १० copies सोबत घ्या. चहा-कॉफी-पाणी-सरबत.

सकाळ पासून ५ ठिकाणी जाऊन आलेय.

आणि ह्या interviewच्या ठिकाणी washroom पण नाही वापरू शकत. किती embarrassing आहे असं इथे washroomला जाणं. आपल्याकडे जॉब मागायला आलेली मुलगी washroomचा पत्ता विचारते. किती वाईट impression पडेल माझं.

आणि ह्या लोकांनी पाणी ऑफर केलं कि बळेबळे प्यावं लागतं. ते हि पूर्ण. नाहीतर अर्धा ग्लास तसाच ठेवला तर त्यांना प्रश्न पडण्याची शक्यता आहे मी optimistic आहे कि pessimistic. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये.

Jpeg

पण आता इतकं चहा-कॉफी-पाणी-सरबत पिऊन झालंय कि जोराची शूला लागलीये. आणि बायकांच्या पोटात गोष्टी आणि मलमूत्र जास्त काळ टिकून राहू शकत नाही. आणि अशा काळात डोकं सरळ track वर चालत नाही. एकच विचार असतो डोक्यात: washroom.

अश्विनी तर म्हणते कि अशा वेळी तिला orgasms येतात आणि she enjoys it! अरे काहीही… Nymphomaniac असल्याची लक्षणे…


Thank god बांद्रा स्टेशनचं washroom चांगलं आहे. नाहीतर घरी जाईपर्यंत माझा bladder blast झाला असता.

तसा आजचा दिवस वाया गेला. एकही चांगली गोष्ट घडलेली नाही.

आणि रात्री अश्विनीला beer पार्टी करायची आहे.


OMG. हा अश्विनीच्या ‘बॉयफ्रेंड’चा भाऊ आहे?

तो जितका खरवसासारखा थुलथुलीत आहे, तितकाच हा in shape, handsome आणि cute आहे… Beauty with brains…


Good morning…

Wow…breakfast in bed…he is perfect guy…

So it’s done. 1st comfort sex in Mumbai….Avdhoot….

क्रमशः

मृगजळ १४: सच का सामना!

आई बाबा आलेत. आता तर ह्यांना पक्का समजणार कि मला जॉब वरून काढून टाकलंय.

हे सगळं ह्या श्रावणीमुळे होतंय. स्वत:ला मुंबई दर्शन करायचं होतं तर एकटीने यावं ना…ह्या दोघांना का घेऊन आली.. हि माझी बहिण नाही दुश्मन आहे. मला त्रास द्यायलाच जन्म झालाय हिचा. हिच्या ह्या अशा विचित्र वागण्यामुळे मी स्वत:ला कधी दोन मुलं होऊ देणार नैये. हम दो हमारा / हमारी एक.

पण आता करू काय?


किसीकी भलाई के लिये बोला झूठ झूठ नहीं होता! और खास कर तब जब वो झूठ अपनी खुद कि भलाई के लिये बोला हो!

स्वार्थात परमार्थ आहे.

त्यामुळे घरच्यांना ऑफिस मधून खास त्यांच्यासाठी दोन दिवस सुट्टी घेतली आहे असं सांगण्यात मला अज्जिब्बात लाज वाटलेली नाही.

तरी त्यात श्रावणीचे दहा हज्जार प्रश्न. अशी कशी सुट्टी दिली? कुणी दिली? का दिली? तुला काम नाहीये का? बॉस ओरडले नाही का?

असो.

आता आज परत ह्यांच्यासोबत मुंबई दर्शन. चलो.


घरच्यांसोबत फिरायला जायचं म्हणजे एक वेगळाच experience असतो. तेच शहर, तेच रस्ते, तेच लोक किती वेगळे वाटतात. काल ह्याच भागात एकटी फिरत होते, आज ह्यांच्यासोबत. Total perspective change.

आणि सर्वात भारी म्हणजे हे बेस्टचं फिरतं उपाहरगृह. स्वस्त आणि मस्त. राजाबाई tower आतून बघता येत नाही ह्याची खुन्नस त्याच्या समोरच उभ्या असलेल्या ह्या बसमध्ये स्वस्तात पेटपुजा करून निघाली.

Jpeg

कधी विचारही केला नव्हता कि बेस्टच्या normal regular city busचं रुपांतर ह्या लोकांनी restaurant sorry उपहारगृहात केलं असेल! इथे छोटं बेसिन पण आहे आत…हेहेहे…आणि चहा फक्त ६ रुपयात! च्यायला पुण्यात पण एवढा स्वस्त मिळत नाही.


काय हौस आहे ह्या लोकांना मुंबईच्या लोकलमधून जायची. इतकी गर्दी, कचकच, त्यात ह्या shopping bags, त्यात आई आणि श्रावणी पण माझ्यासाठी bags सारख्याच आहेत. हातात पकडून घेऊन जावं लागतंय ह्यांना.

एक लोकल गेली तर काय झालं दुसरी मोकळी येईल कि! काय मूर्खपणाचं logic लावते हो श्रावणी. जरा म्हणून गप्प बसवत नाही.

अरे यार आता ह्या इतक्या गर्दीत मुंबईत कोण मला हाका मारतंय??


१५ दिवस होते मी त्या ऑफिसमध्ये. हि पद्मश्री ऑफिस खालच्या रस्त्यावर पण कधी दिसली किंवा भेटली नाही मला. आणि आज भेटली तर direct स्टेशन वर. ते हि आई बाबा आणि ती भोचक भवानी श्रावणी सोबत असताना.

हजारो प्रार्थना केल्या तरी हि मुंबा देवी थोडी ऐकणार होती माझं. समजलंच शेवटी आई बाबांना कि मला काढून टाकलंय म्हणून. नशीब तिने कारण नाही सांगितलं.

माझ्या आळशीपणामुळे जॉब वरून काढून टाकलं. वा! काय कारण आहे!

आणि आई बाबांना पटलं पण. अशा अविर्भावात वावरत आहेत कि जणू किती ओळखून आहेत ते मला.

पण आता पुढे काय?

क्रमशः

मृगजळ १३: Therapy

काय गरज होती मला नको ते धंदे करायची…

पाटील is my boss and he has a right to fire me!

किर्तीशी बोलून पण काही उपयोग नाही…गप गुमान दोघांना सोडून दिलं असतं मी तर बरं झालं असतं…भोगा आपल्या कर्माची फळं…

आता आईला काय सांगणार मी? श्रावणी किती चिडवेल मला…परत पुण्यात गेले तर इज्जतीचा भाजीपाला…

एका महिन्याच्या आत नोकरी वरून काढून टाकलं कारण मी बॉसच्या विरुद्ध एक मूर्ख पाणचट कात रचला…स्वत:ला count of Monte Christo समजायला लागले मी…

आता काय करू? ह्या सगळ्यातून मला एकच व्यक्ती वाचवू शकते… अश्विनी…


तशी बिनकामाची दिसत असली तरी अश्विनी आहे जुगाडू…

दुसरा जॉब शोधायला मदत करायला सुरुवात पण केली तिने…माझ्यापेक्षा तीच जास्त excited आहे.

ती म्हणाली तसं आईला आत्ता काही सांगत नाही. दुसरा जॉब मिळे पर्यंत सगळं आधी सारखं नॉर्मल आहे हेच सांगेन…

पण दुसरा जॉब मिळेपर्यंत करू काय?


एकटीने मुंबई दर्शन…हा plan चांगला आहे. Colaba causeway ला shopping, Leopold cafe ला पेटपूजा, गेट वे आणि Marine Driveला एक चक्कर आणि जहांगीर art gallery. वेळ कसा गेला समजलंच नाही…

च्यायला इथे किती स्वस्त आणि मस्त shopping झालं माझं…

दोन्ही anklets मिळून फक्त १०० रुपये! पुण्याला एक २००ला विकलं असतं त्या चोर दुकानदारांनी…

Jpeg

लोक म्हणतात ते बरोबर आहे, Shopping is a therapy. इतक्या टेन्शन मध्ये पण थोडंस shopping मूड चांगला करून टाकतं.

पण मी रोज रोज तर असं shopping करू शकत नाही. लवकरात लवकर जॉब शोधायला हवा. नाहीतर मला वेड लागेल.


आज आईने अजून फोन कसा नाही केला?

आई बाबा श्रावणी कुणीच फोन उचलत नाहीये. घराचा फोन पण नाही. मला सोडून कुठे फिरायला गेले हे??


आई बाबा…तुम्ही इथे काय करताय?

हो हो… It’s a PLEASANT surprise!

मृगजळ १२: डाव पलटी!

सकाळी लवकर उठा, पाण्याचे नळ सुरु करा…बाथरूमच्या टाकीचा वेगळा नळ, किचनच्या टाकीचा वेगळा नळ…बादल्या भरा, ह्याच वेळेत अंघोळी आटोपा…च्यायला संपतच नाही हे सकाळचं दुष्ट चक्र..

बाहेर इतका मस्त पाउस पडतोय! कॉफीचा मग आणि एक पुस्तक घेऊन गोधडी पांघरून वाचत बसावं! पण हि चैनीची गोष्ट आपल्याला परवडणारी नाही. चला कामाला लागा…अजून प्रदीप आणि पाटीलचं काय करायचं ते पण ठरवायचं आहे.


ट्रेन मध्ये birthday party… च्यायला कमाल आहेत ह्या बायका. मिनलच्या birthday साठी मंजुषा ताईंनी रात्री घरी जाताना समोस्याची order दिली आणि सकाळी येताना घेऊन आल्या. आणि माझ्यासाठी एक प्लेट बाजूला काढून ठेवली होती?

पुण्याला कुणाचा birthday असला कि महिनाभर आधी पासून planning सुरु होतं आणि पार्टी पण अशी मिळते जसे उपकार केलेत. पुणेकर खरंच कंजूष असतात का? Suffocated एका box मधलं आयुष्य जगतात??


हे चांगलंय. प्रदीपने date साठी विचारलं तर पाटीलला पण सोबत घेऊन आले. दोघांना एकत्र date करायचं तर dateला बाहेर जाताना पण दोघांना घेऊन जायचं…बिचारे मला criticize च करू शकणार नाहीत!

कॉफी नाही तर चहावर भागवलं आज. हरकत नाही!

etwm9542

पण ह्या दोघांना काहीतरी धडा शिकवायलाच हवा. हे तिघांनी एकत्र बाहेर जाण्याने काहीच साध्य होणार नाही.


पद्माश्रीला convince करणं तसं सोप्पं गेलं. मला तर वाटलं कि ती चिडेल म्हणून. पण माझी मदत करायला चक्क हो म्हणाली ती! प्रदीपच्या घराचा पत्ता तरी मिळाला तिच्या निमिताने.

Now plan B!

शुध्द शाकाहारी दक्षिण भारतीय माणसाच्या घरी बियरची बॉटल आणि चिकन घेऊन जाण्याची मजाच काही और आहे! Celebration करायला दारू तर लागतेच यार… आणि त्यात celebration जर प्रदीप आणि पाटीलच्या anniversary चं असेल तर विचारायलाच नको!

त्याच्या घरच्यांवर त्याच्या gay असण्याचा खोटा बॉम्ब टाकला खरा पण तो सुता सारखा सरळ नाही म्हणून..पाटील आणि त्याचे photos facebook वर gay couple celebrates one year anniversary म्हणून viral पण झालेत!! आता होईल तुमच्या इज्जतीचा कचरा.


माझाच डाव माझ्यावर पालटला. आता मला काय स्वप्न पडलं होतं का कि प्रदीप खरंच gay असेल म्हणून?? आणि मी त्याला त्रास द्यायला म्हणून घातलेला घात त्याच्या उपयोगी येईल?

खरंच म्हणतात लोक…कुणाचं वाईट करून आपलं चांगलं कधी होत नाही.

पण आता पाटील काही सोडणार नाही मला. त्याच्याशी कसं deal करावं  ह्याचा विचार करावा लागेल आता.


हो आई पोहोचले घरी. नाही जेवूनच आलेय..

तुला कसं समजलं कि प्रदीपची party होती? हि श्रावणी यार…मी ना facebook वर block च करते आता तिला. माझ्याशी प्रत्यक्ष बोलायला वेळ नाही तिला पण मला facebook वर stalk करू शकते ती.

नाही चिडत ए मी…असो…

आई मी ठेवते फोन..थकलेय खूप..झोपायचं ए मला.. Bye…


मला ऑफिसच्या सगळ्या Whats app ग्रुप्स मधून का काढून टाकलंय?

Fuck…..I am fired??

क्रमश:

मृगजळ ११: बदला

आई नको तेव्हा लवकर उठवते आणि पाहिजे तेव्हा झोपू देते…इतक्या दिवसांनी आलीये पोर म्हणून म्हटलं झोपू द्यावं…अरे म्हणून मला कुंभकर्ण आणि स्वत:ला अलका कुबल करायची काय गरज होती???

आता मी आवरणार कधी, निघणार कधी, बस कधी मिळणार आणि मी पोहोचणार कधी?

परत शिव्या खाणार आज मी…


दादरला पोहोचायलाच चार वाजले..आता इथून पुढे घरी जाऊन सामान ठेवून परत ऑफिसला जायचं म्हणजे ६-६.३० तरी होणार…मग त्यानंतर ऑफिसमध्ये काय घंटा काम होणारे?

पाटीलला फोन करते आणि सांगते कि नाहीच येत मी आज म्हणून…


जगातली पुणेकर असेन मी जी पुण्याहून मुंबईत घरी जाण्या ऐवजी आधी ऑफिसला आली…

आणि त्यात हे एवढं काम…अरे दीड दिवसाची सुट्टी घेतली होती मी चौदा वर्ष वनवासात नव्हते गेले जे इतकं राबवून घेत आहेत…

It’s so embarrassing! आणि ह्या लोकांकडून माझी खाउची bag लपवणं तर खूपच अवघड आहे. पण सगळ्यात अवघड प्रश्न हा आहे कि मी परळहून मालाडला ३ bags घेऊन लोकलने कशी जाणार ए?

पद्मश्री अजून हि बिचारी senty आहे..इन मीन तीन दिवसांचं relationship तिचं प्रदीपसोबत. जेव्हा तिला समजेल कि मी त्याला date करत आहे तेव्हा काय होईल??

प्रदीप आणि पाटीलला dating life public करू नका हे सांगितल्यावर लगेच ऐकलं म्हणून नशीब. माझ्यामुळे माझ्यासाठी दोघं गप्प आहेत. पण किती काळ?


I just don’t believe this!

कीर्ती मला घरी सोडत आहे. इतके उपकार मज पामरावर!!

हिला पण मी चुकीचं समजत होते का? हि देसते आणि वागते तितकी वाईट नाहिये.

पण हि मला माझ्या dating life बद्दल इतके प्रश्न का विचारात आहे? प्रदीप किंवा पाटीलने माती तर नाही ना खाल्ली??


OMG! मी दीड दिवस नव्हते तर अश्विनीने काय अवस्था करून ठेवली आहे रूमची??

पसारा आणि कचरा..देवा रे…किचन आहे कि कचरापेटी?

आणि हि इथे अशी लोळत बसली आहे…seriousness म्हणून नाही काही…

img-20160919-wa0002

अश्विनी……………………………

आणि ह्यात हि कीर्ती का फोन करत आहे…आत्ताच सोडलं ना तिने मला…


Those f@#$%*!!!

म्हणून कीर्ती मला माझ्या dating life बद्दल इतकं खोदून खोदून विचारत होती. तिने सांगितलं म्हणून…नाहीतर मला समजलंच नसत…

च्यायला दोघांना समजलं कि मी त्या दोघांना date करत आहे तरी मुद्दामून माझ्याशी भांडण्या ऐवजी revenge plan करत आहेत…म्हणून दोघं हि एका वेळी मला date करत आहेत…

But they don’t know that I know that they know!

मान्य आहे चूक माझी आहे पण माझ्यासोबत डबल गेम खेळताय तुम्ही…बघाच आता कशी जिरवते तुमची…

क्रमश:

मृगजळ १०: बदल

काल smoke करावसं वाटत नाहीये असं म्हणून वेळ मारून नेली खरं पण कधी न कधी तरी एक decision घ्यावाच लागेल…आज मयुरीलाच विचारते काय करू ते…

अजून किती वेळ लागेल हि खटारा बस पुण्यात पोहोचायला?? माझी काल रात्रीची अर्धवट झोप पण पूर्ण झाली.

M sooo excited … दोन आठवड्यांनंतर पुण्याला जातीये मी…शाळेत असताना राजस्थानच्या tripला गेले होते त्यानंतर पहिल्यांदाच इतका मोठ्ठा काळ पुण्याच्या बाहेर राहिलेय…

आले पुण्यात! लगेच status update करते. Back in पुणे!

ह्या university रोड ला तेवढीच गर्दी आहे आज पण..अज्जिब्बात बदललं नैये पुणे..हेहे..


पुण्यात आल्यावर पहिले काय करावं तर आपल्या आवडत्या जागी पेटपूजेस जावं!

हि मयुरी काहीही म्हणते… This chocolate brownie is so amazing that I can have sex with it!

img_20141207_161535496

मान्य आहे दर्शनमध्ये मिळते तितकी बेस्ट chocolate brownie with vanilla ice cream हि डिश कुठेच मिळणार नाही…पण अशी कमेंट करावी?

I mean how can anyone have sex with a brownie? आणि त्यात ते hot chocolate पण घालून देतात…अवघड आहे हिच्या बॉयफ्रेंडचं…


पुण्यात सगळे इतके हळू का झालेत…किती हळू चालतात लोक. सिग्नल पण हळूच. पाणीपुरीवाला पण इतक्या हळू हात चालवतोय…मुंबईत असते तर इतक्या वेळात ३ पाणीपुर्या खाऊन झाल्या असत्या माझ्या..

हे अक्षरधारा वाले पण स्लो झालेत.. sidney sheldon ची २ पुस्तकं घेतली तर त्यात इतकं डोळे वटारून बघायची काय गरज आहे…मराठी पुस्तकांच्या दुकानातून माणूस इंग्लिश पुस्तक नाही का घेऊ शकत??

अरे यार हि मयुरी पण स्लो झाली आहे…

रानडे वाले काका पण maggi द्यायला इतका वेळ लावत आहेत…

हा सगळा मुंबईच्या fast life चा होणारा परिणाम आहे कि काय…


मला तर सिंहगडावर पण जायचं होतं पण खडकवासला पर्यंतच मजल मारता येणार ह्या वेळेस…

Don’t worry पुढच्या वेळेस मी येईन आणि गड कुठेही जाणार नाही…


आणि आईच्या हातचा वरण भात, बटाट्याची पिवळी भाजी आणि कोशिंबीर! बाकी काय हवं माणसाला?

श्रावणीने ढापलीच माझी नवी चप्पल…वाटलंच होतं मला…

मी दीड दिवसासाठी आलेय तर आईने सगळ्या नातेवाईकांना जेवायला बोलावलं…दोन मिनिटांची उसंत नाही मला…

मी विचार केला होता कि रात्री मस्त Apache ला जाऊ…२-३ पिचर मारू..पण कसलं काय…बियरची तहान ताकावर भागवत आहे…


उद्या सकाळी परत जायचं…शी…किती बोअर आहे हे आयुष्य…पण हेच तर हवं होतं मला…

समीर मामा म्हणाला तसं मी खरंच मुंबईकर होत चाललीये का? २ आठवड्यात मुंबईची इतकी सवय झाली कि पुणं परकं वाटायला लागलंय??

नाही… East or west Pune is the best!!!


कुठून इतका प्रकाश येतोय…श्रावणी तो पडदा बंद कर….

९वाजले ??? माझी सिंहगड!!!!!!!!!

क्रमश:

मृगजळ ९: हे की ते?

विश्वासच बसत नाहीये माझा…दोन आठवडे झाले मला मुंबईत येऊन आणि मी अजूनही जिवंत आहे..वाह!

जर तुम्ही पुण्याच्या रस्त्यांवर गाडी चालवू शकता तर जगात कुठेही गाडी चालवू शकता त्याच प्रमाणे जर तुम्ही मुंबईत न थकता, न हरता पंधरा दिवस काढू शकता तर तुम्ही जगातलं कुठलही आव्हान पेलू शकता…

I am confident now… मी आता काहीही करू शकते…


Oh no… I spoke too soon….

मी हे एवढं काम नाही करू शकत…आल्यापासून एक दिवस सुट्टी नाही मिळालेली मला..माझे पाय खराब झालेत त्या लोकलच्या प्रवासाने. ते घासायला पण वेळ नाही मला. कित्येक युगं उलटली मी शांतपणे केस धुतले ह्या गोष्टीला.

ऑफिस मधले ४ लोक आणि सकाळच्या ट्रेन मधल्या ५ बायका इतकं limited friend circle झालंय माझं. रोज तेच खा, तेच प्या, तीच ट्रेन, तीच गर्दी, तेच चेहरे आणि तीच गाणी. मुंबईतलं आयुष्य फक्त धकाधकीचं नसतं तर monotonous पण असतं.

आता ह्यावर एकच उपाय. २ दिवसांची सुट्टी घ्यावी आणि पुण्याला जाऊन यावं. नाहीतर माझं रजनीकांतच्या चिट्टी रोबो सारखं होईल… Human रोबो…


पाटीलला थोडं convince केलं कि लगेच हो म्हणाला..आज मूड चांगला दिसतोय साहेबांचा.

जाताना काहीतरी सोबर घेऊन जाते. नाहीतर सगळे म्हणतील मुंबईहून आलीस पण आमच्यासाठी काही नाही आणलं. पण मुंबईचं असं घेऊन जाण्यासारखं काही स्पेशल काय ए? आत लोकल ट्रेन तर pack करून घेऊन जाऊ शकत नाही for obvious reasons!

काय न्यावं?


ट्रेनमध्ये चढताना कधीही हेडफोन्स घालून चढू नये…माझे JBL चे हेडफोन्स तुटले बिचारे ह्या गर्दीच्या मुळे…आणि आता चढल्यानंतर इतकी गर्दी आहे कि खिशात हात घालून दुसरे हेडफोन्स घेणे अगदीच अशक्य.

ह्या बायका हेडफोन्स पण घालतात आणि त्या एवधुश्या स्क्रीन वर पिक्चर पण बघतात? कमाल आहे बुवा!


आता उद्या सकाळी घरी जात आहे तर हे सगळे कपडे घेऊन जाते. चादर, जीन्स, सर्व कुडते घरीच धुईन आता…

एका दिवसासाठी दोन bags झाल्या. हरकत नाही. कुणाला तरी बोलावेन pick up करायला.

हि अश्विनी पण विचित्र आहे. स्वत:च्या चादरी पण दिल्या धुवायला. आम्ही काही भांडारकर रोडच्या नागेश्वर laundry चे मालक नैओत…जे कुणीही यावं आणि चादरी देऊन जावं!

सगळेजण miss you चे मेसेजेस करत आहेत. जसं कि खरंच माझी आठवण येणारे. मोजून दीड दिवसाची सुट्टी दिली आहे. परवा हाल्फ डे ऑफिसला जायचंच ए परत. गणपती करून टाकलाय माझा.


तिकीट घेतलं, काजळ, हेडफोन्स, सगळ्या बायका मुलींसाठी स्वस्त आणि मस्त कानातली, नवीन चपला, एक पुस्तक, portable charger, सुट्टे पैसे..

प्रदीप आणि पाटील एकत्र भेटायला आलेत? माजरा क्या है?


मी उगाच आले ह्यांच्यासोबत movie बघायला…आता इथून घरी जायला २ तरी वाजतील. मग मी आवरणार कधी? झोपणार कधी? सकाळी उठणार कधी? श्या….

दोन मुलांच्या मध्ये बसलेय मी…दोघं लाईन मारत आहेत…

प्रदीपने पद्मश्रीला सोडलं माझ्यासाठी आणि पाटील नेहमी मला ऑफिसमध्ये सांभाळून घेतो… Way better and mature than प्रदीप..पण आयुष्यात नेहमी maturity आणि practicality घेऊन काय करायचं? थोडा romance, time pass आणि fun पण हवं जे प्रदीप मध्ये आहे…

OMG… ह्या दोघांना एकत्र date करणं खूप अवघड आहे. दोघं आता माझ्या दोन बाजूंना बसले आहेत पण ह्यांना जेव्हा समजेल कि मी दोघांना date करत आहे तेव्हा माझं काय होईल?? देवा रे…

दोघांनी cigarette ऑफर केली. एकाने मार्लबोरो लाईट आणि दुसर्याने गोल्ड फ्लेक…मला दोन्ही आवडतात पण प्यावी तर एकच लागेल…कुठली घेऊ??? ह्या प्रश्नाचं उत्तर तर Polinion वर पण नाही मिळणार…

It looks like I don’t have any other option. I have to choose…

whatsapp-image-2016-09-17-at-2-51-56-pm

 क्रमशः

मृगजळ ८: शेवटापासून नवीन सुरुवात

आज परत ओरडा खाणार…माझी लोकल पण मिस झाली…ह्या बायका हिल्स घालून कशा चढतात लोकलमध्ये…आश्चर्य आहे…


खाल्लाच ओरडा किर्तीचा…ढीगभर काम देऊन ठेवलंय हिने…आता एका दिवसात हे कसं पूर्ण होईल…करू कसं तरी…

सगळ्यांना काय झालंय? सगळे माझ्याशी असे का वागत आहेत जसं कि काही झालंच नाहीये…कुणी चिडवत नाहीये, टोमणे मारत नाहीये, फुकटची sympathy दाखवत नाहीये…मी पुणे मिस करतीये का?

पुण्यात असताना कुणीही pamper केलेलं, चिडवलेलं, फुकटची sympathy दाखवलेलं, माझ्याबद्दल gossip केलेलं आवडायचं नाही..तेव्हा वाटायचं कि अशा ठिकाणी निघून जावं जिथे आपण काय करतो, कुणाशी बोलतो आणि कुठे जातो हे कुणीच आपल्याला विचारणार नाही… pamper करणार नाही किंवा फुकटची sympathy पण दाखवणार नाही..

आणि आता मी अशा जागी आलेय..जे हवं होतं ते मिळालंय तरी Why am I not happy? Am I missing being the centre of attraction?

मयुरी म्हणते तसं गेल्या २३ वर्षात ज्या राहणीमानाची सवय झाली होती ती बदलल्याने cultural shock बसला आहे बहुतेक…


प्रदीपला मी फाट्यावर मारलं तर पद्मश्री किती खुश झाली…ह्या दोघांचं south Indian two states होणार बहुतेक… असो…चेतन भगत पेक्षा चांगलं असेल हे नक्की…

पाटीलला date करावं का? नको…ढेरी आहे त्याला…पण तसा cute आहे तो…पण नकोच…आगीतून फुफाट्यात व्हायचं…

९ इथेच वाजले…आता कधी ट्रेन मिळणार, कधी घरी जाणार, कधी स्वयंपाक करणार, कधी जेवणार….


अग नाही अजून स्टेशन वरच आहे…हो अग खूपच उशीर झाला…नाही मी खाल्लंय तसं संध्याकाळी… Don’t worry…

आई तनिष्काच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी असते ना त्याच्या दुप्पट गर्दी आहे आत्ता platform वर…तू उगाच काळजी करतेस…

मी घरी पोहोचले कि मेसेज करते…

आई train आली…बाय…


ह्या अश्विनीला म्हणायला काय जातं कि मुंबईतल्या experiences वर एक blog लिही… Girl in the city types काहीतरी….काहीही म्हणते…लिहिण एवढं सोप्पं असतं का…

May be एखादं status update करू शकते….

status-10-sept-1


आई बाबा वाचतील तेव्हा चक्कर येऊन पडतील…But seriously I don’t care now…It’s time to do something mad…मुंबईत येऊन थोडं मुंबईकरांसारखं वागलं पाहिजे…कुणाची पर्वा न करता, हवं तसं, वाट्टेल तसं वागायचं…

पण करू काय?

पाटील काय करत असेल??


७??? आज रविवार आहे…सुट्टीचा दिवस…आणि आज मला ७ला जाग येतीये…

माझ्यासोबतच असं का होतं?

असो…आज सगळं घर आवरते…shopping पण करायची आहे…पण मुंबईतली रविवार पेठ कुठे आहे?


उद्यापासून परत तेच दुष्टचक्र सुरु होणार…मुंबईतल्या विचित्र adjustments आणि पुण्याच्या आठवणी…

पण पिया move on म्हणत कीर्तीला आणि तिच्या त्या arrogant bossy attitudeला सामोरं जावंच लागेल…

लोक म्हणतात ते बरोबरच आहे… Grass is always greener on the other side of the road… Still a beautifully unfinished weekend balances it all…

 

समाप्त.

A WordPress.com Website.

Up ↑

%d bloggers like this: