Mumbai Travel Pages: Part 2

लोकलने प्रवास करण्याआधी, लोकलच्या आत आणि बाहेर उतरल्या नंतर पाळायच्या अनेक गोष्टी मी बघून बघून शिकले. चुकत होते तेव्हा काही बायकांनी शिव्या घातल्या तर काही जणींनी शांत समजावून सांगितलं.

   १. जर लोकलने प्रवास करणारे तुम्ही नवखे असाल तर  सुरुवातीला 1st क्लासचा पास/तिकीट काढण्याऐवजी सवय होई पर्यंत सेकंड क्लासनेच जावे. कारण फर्स्ट क्लासच्या बायका खूप शिष्ट असतात आणि त्या नेहमी मदत करतीलच असे नाही. लोकलमध्ये फर्स्ट क्लासचे डब्बे पण छोटे असतात. सेकंड क्लास मध्ये कितीही गर्दी असली तरी सांभाळून घेणाऱ्या आणि मदत करणाऱ्या खूप बायका भेटतात.

    २.  तुमची sack किंवा side bag हि नेहमी छातीशी पकडून प्रवास करावा. कारण चढताना, उतरताना किंवा गर्दीतून जाताना आपली bag मागे अडकण्याची शक्यता असते आणि अशा bag अडकलेल्या बायकांवर इतर बायका खूप भडकतात आणि कचाकचा भांडतात. आणि एका दृष्टीने bag पुढे घेऊन प्रवास करणे हे आपल्याला हि सोयीचे पडते.

    ३. लोकल मध्ये चढताना किंवा उतरताना शक्यतो headphones लावू नयेत. ते अडकण्याची शक्यता असते. एकदा का तुम्ही ट्रेन मध्ये सुखरूप चढलात किंवा उतरलात कि हवी तितकी गाणी ऐका किंवा गप्पा मारा.

   ४.  ट्रेनच्या डब्ब्यात एकदा घुसल्यावर खूप गर्दी असेल आणि बसायला जागा नसेल तर आत सरकताना सरळ शिरू नये. तिरके होऊन आत जावे त्यामुळे धक्के कमी लागतात आणि लगेच घुसता येते.

    ५. नेहमी आपल्या bag मध्ये आणि खिशात किमान २-३ ठिकाणी पैसे ठेवावे. म्हणजे जरी पाकीट चोरीला गेले तरी backup पैसे जवळ असतात. आपलं पाकीट, फोन किंवा इतर मूल्यवान वस्तू ह्या bagच्या मधल्या कप्प्यात ठेवाव्या. पुढच्या किंवा बाजूच्या कप्प्यात ठेवल्या तर चोरीला जाण्याची किंवा निसटून पडण्याची शक्यता असते.

     ६. सर्व कप्पे बंद असणारी आणि water proof bagच वापरावी.

    ७.  तुमची bag ट्रेन मध्ये वरच्या holder मध्ये ठेवायला काहीच हरकत नाही पण अधून मधून त्यावर लक्ष ठेवावे. अनेक बायक पाकीट काढून घेऊन मग bags वर ठेवतात. म्हणजे चोरी झाली तरी पाकीट आपल्या कडेच असतं.

    ८.ट्रेन मध्ये चढताना सांभाळायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे केस. तुमचे केस जर खांद्याच्या खाली रुळणारे असतील तर ते वर बांधून घ्यायला विसरू नका. कारण चढताना अनेकदा मोकळे केस, मोठी वेणी किंवा नुसता बो पण ओढला जाऊन तीव्र वेदना होण्याची शक्यता असते.

    ९.  सुरुवातीचे काही दिवस बसायला जागा मिळवण्यापेक्षा नीट चढण्याला जास्त प्राधान्य द्यावे. एकदा नीट चढता आले कि बसायला पण जागा मिळतेच. जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत चढताना आणि उतरताना कधीही पहिल्या फळीत थांबू नये नाहीतर गडबडून जाल आणि उगा बायकांच्या शिव्या खाव्या लागतील.

    १०.  ट्रेन ने प्रवास करायचा म्हणजे धकाबुक्की करणे आणि गळा फाडून बेधडक अपमान करणे ह्यात पारंगत असणे अतिशय महत्त्वाचे आहे. समोर जागा असून ही पुढची व्यक्ती हलत नसेल किंवा भरभर उतरत नसतील तर बिनधास्त धक्का मारायचा पण कुणाला त्यातून इजा होत नाही न ह्याची काळजी घेत. आणि ट्रेन मध्ये भांडणं हा मुंबईकर बायकांचा जन्मसिद्ध हक्क असतो. पण दुसर्याच्या भांडणात तोपर्यंत पडायचे नाही जोपर्यंत बोचकारणे/ झिंज्या उपटणे/ मारामारी अशा घटना घडत नाहीत.

   ११.मुंबईतल्या प्रत्येक उपनगरीय स्टेशनच्या जिन्यावर east आणि west अशा पाट्या दिलेल्या असतात त्यामुळे जिना चढतानाच आपली दिशा ठरवून घ्यावी आणि त्याप्रमाणे जीना चढवा. जर पाटी नसेल तर फूड stoll वर किंवा गर्दीतल्या कुणाला तरी विचारावे.

   १२.  जिन्यावरून जाताना किंवा स्टेशनाच्या आत पण आपल्या डाव्या बाजूने चालावे. गर्दीचा जरा अंदाज घेऊन त्या प्रवाहात चालणे कधी ही योग्य नाहीतर आपण घाईघाईत प्रवाहा विरुद्ध चालायला लागतो आणि गर्दी, धक्के आणि शिव्यांचा भडीमार सहन करावा लागतो.

   १३.  शक्यतो direct ट्रेन ने प्रवास करावा. कारण चर्चगेट पासून येणारी अमाप गर्दीत आपण कधी बुडून जाऊ समजतच नाही.

   १४.  ट्रेनने जाताना पायात flotus, बंद shoes किंवा comfirtable चपला घालाव्या. शक्यतो हिल्स टाळावे. पंजाबी ड्रेस घातला असेल तर ओढणी किंवा स्टोल गळ्यात ठेवून चढू नये. ते गर्दीत अडकून गळफास बसण्याची किंवा गळ्य भोवती जखम होण्याची शक्यता असते.

    १५.  लोकलने प्रवास करताना आपली bag छोटी असो वा मोठी, त्यात काही गोष्टी नेहमी ठेवाव्यात. एका कप्प्यात extra पैसे, एक extra रुमाल किंवा छोटा napkin, एखादे फळ, २-३ chocolates आणि वाचायला एखादे पुस्तक.

ह्या सर्व गोष्टी मी लक्षात ठेवते आणि त्या माझ्या उपयोगाच्या आहेत पण हे गरजेचे नाही कि ह्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला मान्य असतील किंवा त्या तुम्ही follow करालच. आणि एकदा प्रवास करायला लागलात कि २-३ दिवसात आपण इतके अनुभवी होतो कि शतकानुशतके आपण लोकलने प्रवास करायच्या कलेत तरबेज आहोत असे वाटायला लागते. हा confidence काही वाईट नाही पण म्हणून ट्रेन मधून platform वर उड्या मारणे, दारात उभे राहणे हे प्रयोग लगेच नकोत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s