Mumbai Travel Pages: Part 1

मुंबई ही माया नगरी आहे असे म्हणतात. एवढ्या मोठ्या शहरात कुणी कुणाचा वाली नसतो. सगळे आपापल्या घाई गडबडीत असतात. लोकल्स, बसेस, मेट्रो आणि रिक्षा च्या गर्दीतून वाट काढणारी मुंगी सारखी माणसं प्रत्येक उपनगरात दिसतात. तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या गर्दीत नाचा, रडा, गा, किंवा भांडा, लोक दोन सेकंद बघून दुर्लक्ष करतात. घड्याळ्याच्या काट्यावर चाललेलं आयुष्य कुठे डोकावून बघायची संधीच देत नाही.

अशा ह्या आत्ममग्न मुंबईत मात्र मदतीचा हात मिळत नाही असे कधीच होत नाही. मुंबईत येऊन मला अद्याप एक महिना पण नाही झाला पण प्रत्येक अडी-अडचणीच्या वेळी ओळखी-अनोळखी लोकांनी नि:संकोच पणे मदत केली. कुठली बस पकडायची इथ पासून ते लोकल मध्ये एखाद्या बाईशी भांडण्या पर्यंत. गर्दीत तुम्ही एकटे असाल तरी कुणी तुम्हाला एकटं पडू देत नाही.

मुंबईत रुळायला जास्त काळ लागतं नाही. मुंबई तुम्हाला लगेच आपलसं करून घेते. प्रवासात खूप वेळ जातो पण लोकांना बघत, गाणी ऐकत किंवा एखादा पुस्तक वाचत वेळ कसा निघून जातो समजत नाही. मुंबईत लोकलने पूर्णपणे एकटीने प्रवास करण्याची हि माझी पहिली वेळ. आणि अमिताभ बच्चन ह्यांनी म्हटल्याप्रमाणे “पेह्ली बार सिर्फ एक हि बार होता है और वो बहोत खास होता है!” माझाही पहिला अनुभव असाच खूप खास होता. आणि नंतर माझ्या प्रवासात कळत नकळत, सल्ले ऐकत, observe करत मी अनेक गोष्टी शिकले. माझे हेच अनुभव मी माझ्या ह्या आणि पुढच्या काही लेखांमधून share करेन. मुंबईत मी फक्त पश्चिम रेल्वे मार्गावरच प्रवास केलं आहे त्यामुळे माझे लोकल प्रवासाचे अनुभव थोडे मर्यादित आहे. त्यामुळे माझ्या लिखाणातून तुम्हाला प्रामुख्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील माहिती आणि अनुभव वाचायला मिळतील.

मुंबईत लोकलने अथवा बसने फिरताना अनेक गोष्टी पाळाव्या लागतात, लक्षात ठेवाव्या लागतात. त्यातली एक म्हणजे बस, मेट्रो आणि लोकलचे वेळापत्रक. ह्यासाठी ‘m-indicator’ हे अतिशय सोप्पे आणि महत्त्वाचे mobile app. हे app तुम्ही google play तसेच apple store वरून डाउनलोड करू शकता. ह्या app वर तुम्हाला सर्व प्रकारचे वेळापत्रक, त्यातील बदलांच्या सूचना आणि इतर अनेक गोष्टी समजतात.

travel pages 1.png

मुंबईत प्रत्येक उपनगरीय platform वर येणाऱ्या ट्रेन्सची माहित देणारे मोठे indicaror लावलेले असतात. ह्यामध्ये गंतव्य म्हणजे ट्रेन जिथे जाणार आहे ते शेवटचे ठिकाण; वेळ; गती म्हणजे फास्ट(F) ट्रेन आहे कि स्लो (S); मिनट में अपेक्षित म्हणजे किती वेळात ट्रेन platform वर येणार आहे ह्याची माहिती दिलेली असते. अशाच प्रकारचे मोठे TV LED idicators पण लावलेले असतात.

गंतव्यच्या रकान्यात स्टेशनचे पूर्ण नाव न देता फक्त आद्याक्षरे दिलेली असतात. वेस्टर्न लाईन ला म्हणजेच पश्चिम रेल्वेच्या काही महत्त्वाच्या स्टेशन्सची आद्याक्षरे पुढील प्रमाणे:

Churchgate CCG
Mumbai Central BCL
Dadar DDR
Bandra BA
Andheri ADH
Borivali BVI
Bhayandar BYR
Vasai Road BSR
Virar VR
Palghar PLG
Boisar BOR
Dahanu Road DRD

प्रवासाची सवय झाल्यावर सर्व स्टेशन्सची माहिती तर होतेच पण तरी आधी पासूनच कुठल्या स्टेशन नंतर कुठले स्टेशन येणार हे माहित असणे फायदेशीर ठरते. लोकलच्या प्रत्येक दाराच्या वर एक map लावलेला असतो. तसेच ट्रेनमध्ये देखील आता पुढचे स्टेशन कोणते ह्याची सतत annouencement होतच असते. तरी मुंबईत कुठलीही माहिती असणे वाया जात नाही.

travel pages 4

 

फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन मधला फरक अतिशय सोप्पा आहे. फक्त वर दिलेल्या स्टेशन्स वर थांबणारी ट्रेन म्हणजे फास्ट ट्रेन. आणि वर दिलेल्या स्टेशन्स दरम्यानच्या सर्व स्टेशन्स वर थांबणारी ट्रेन म्हणजे स्लो ट्रेन. नकाशात western line ला गुलाबी रंगात दिसणारी पट्टी म्हणजे फास्ट लाईन आणि निळ्या रंगात दिसणारी पट्टी म्हणजे स्लो लाईन.

लोकलने प्रवास करायचा म्हणजे अनेकांच्या मनात भीती असते. पण जर प्रवास करताना, करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर लोकलने करायचा प्रवास सुखकर ठरतो. ह्या काही खास गोष्टी मी अनुभवातून तसेच अनेकांच्या सल्ल्यातून (स्पेशली आईच्या) शिकले. ह्या गोष्टी पुढच्या लेखात. तोपर्यंत माझ्या अनुभवाचं गाठोडं वाढत जाईल ह्यात शंका नाही!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s